बारामती : तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या माळेगाव येथील गोविंदबाग या निवासस्थानासमोर शुक्रवारी ‘ढोल बजाव’ आंदोलन करण्यात आले.
धनगर आरक्षणासाठी धनगर समाजाच्यावतीने आज राज्यभर आंदोलन करण्यात आले होते. सरकारने धनगर समाजाच्या भावनांचा आदर करून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा यांसह विविध मागण्यांसाठी ‘ढोल बजाव’ आंदोलन करण्यात आले.
फडणवीस सरकारने धनगर समाजासाठी मंजूर केलेले १००० कोटी रुपये धनगर समाजाच्या विकासासाठी खर्च करावेत,समाजाला ST प्रवर्गात समाविष्ट करून ST प्रवर्गाला लागू असणाऱ्या सर्व सुविधा धनगर समाजाला लागू कराव्यात व धनगर समाजाचा आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
याचबरोबर महाराष्ट्रभर मेंढपाळांवर हल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मेंढपाळांवर होणारे हल्ले कमी करण्यासाठी सरकारने घटनात्मक बदल करून कायदा लागू करावा व मेंढपाळांना संरक्षण द्यावे. आदी मागण्यांसाठी हे ढोल बजाव आंदोलन करण्यात आले.
Read Also
काय बोलताय, देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार? https://t.co/4Us8Zwr16s
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 25, 2020