महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात पाठराखण केली.
मात्र, यानंतर मनसेमधूनच यावर असहमतीचा सूर ऐकायला मिळतोय. आदित्य ठाकरे यांना पाठिंबा देण्यावरुन बाळा नांदगावकर यांना महाराष्ट्र सैनिकांनीच सोशल मीडियावर ट्रोल केल्याचं पाहायला मिळत आहे
मनसे नेते संतोष धुरी यांनीही बाळा नांदगावकर यांच्या या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली आहे. आदित्य ठाकरे यांच्याबाबतचे मत हे बाळा नांदगावकर यांचे वैयक्तिक मत असावे. आम्ही महाराष्ट्र सैनिक शिवसेनेने दिलेला त्रास आणि दररोजचा आमचा त्यांच्याशी होणार संघर्ष विसरणार नाही, असं मत धुरी यांनी व्यक्त केलं.
दरम्यान आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे या प्रकरणावर काय अंतिम भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.