मुंबई : कंगनाच्या ऑफिसवर आज मुंबई महानगरपालिकेने हातोडा चालवायला सुरुवात केली होती. पालिकेने कंगनाला ऑफिस अनधिकृत असल्याची नोटीस काल दिल्यानंतर पालिकेने आज कंगनाच्या ऑफिसवर तोडफोड करायला सुरुवात केली होती.त्यानंतर मातोश्रीवरून सर्व शिवसैनिकांना आदेश गेल्याचे समजते.
कंगना आज मुंबईमध्ये येणार आहे त्याच पार्श्वभूमीवर गोंधळ होऊ नये यासाठी स्वतः शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना कंगनाच्या विरोधात आंदोलन करू नका असे आवाहन केल्याचे समजते. कंगनाला कोणत्याही प्रकारची सहानुभूती मिळू नहे यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. तसेच कंगना विषयावर कोणत्याही शिवसेना नेत्याने प्रतिक्रिया देऊ नये असे देखील नेत्यांना सांगण्यात आल्याचे समजते.
कंगनानं तिच्या कार्यालयावर सुरू असलेल्या कारवाईचे फोटो ट्विट करुन त्याला पाकिस्तान असं कॅप्शन दिलं आहे. तसंच लोकशाहीचा मृत्यू असंही म्हटलं आहे. बीएमसीचे अधिकारी आणि कर्मचारी कंगनाच्या घराबाहेर तैनात असलेला फोटो ट्विट करत बाबर आणि त्याचं सैन्य असं सांगत शिवसेनेला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
Pakistan…. #deathofdemocracy pic.twitter.com/4m2TyTcg95
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020