मुंबई : अलीकडील काळात भाजप नेते बेजबाबदार विधाने करत आहेत, त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यात काहीही तारतम्य राहीलेल नाही. ते इतरांचे बाप काढतात,परंतु तुमचा बाप काढायला तुम्हाला वारसदार तरी आहे का? असा सवाल करत राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी चंद्रकांत पाटलांवर हल्ला चढवला आहे. भाजप नेत्यांनी बोलताना थोडी काळजी घ्यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस जशास तसे उत्तर देण्यास सक्षम आहे,असा इशाराही त्यांनी दिला.
पुणे महापालिकेतील सत्तेबाबत पालकमंत्री अजित पवारांना स्वप्न पडत असतील तर त्यांनी आपली ऊर्जा वाया घालवु नये, कारण पुणे महापालिकेत आम्ही आम्ही त्यांचे बाप आहोत, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होत. त्यावेळी त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती. आता राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी चंद्रकांत पाटलांवर हल्ला चढवला आहे. भाजप नेत्यांनी थोड जपून बोलाव असा सल्लाही त्यांनी भाजपला दिला आहे.
राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं खरमरीत उत्तर
दरम्यान काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या पत्राला उत्तर देताना खरमरीत शब्दांचा वापर केला आहे. “माझ्या हिंदुत्वाचा आपण जो उल्लेख केला, तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही” अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
Read Also :
राष्ट्रवादीकडून राज्यपालांना संविधानाची प्रत भेट https://t.co/L1xBDNfbDF @Awhadspeaks @AwhadOffice @paranjpe_anand
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 14, 2020