ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला राम राम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांनी प्रवेश केल्यानंतर आज दसऱ्याचा मुहूर्त साधत राष्ट्रवादी कार्यालयात भेट दिली. वाईट प्रवृत्तींशी लढण्याचा हा दिवस असून अपल्यालाही समाजातील वाईट प्रवृत्तींविरोधात लढायचे असल्याचे खडसे यावेळी म्हणाले. असं म्हणत त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं.
एका व्यक्तिमुळे आपलं नुकसान झालं असं सांगतानाच फडणवीस यांची प्रवृत्ती हम करे सो कायदा अशीच असल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली. फडणवीसांची प्रवृत्ती हम करे सो कायदाच होती. त्यांनी स्वत:चे निर्णय लादण्याचं काम पक्षात केलं. सामूहिक निर्णय प्रक्रियेला तिलांजली दिली, अशी टीकाही त्यांनी केली.
“मी भाजपमध्ये थांबलो असतो तर माझं नुकसाना झालं नसतं. पण आपल्या परिसराचा विकास झाला नसता. गेल्या पाच वर्षात आपलं सरकार असतानाही आपल्या भागाला काहीच मिळालं नाही, असं सांगतानाच कार्यकर्त्यांचा दबाव होता. त्यामुळे मी पक्षातून बाहेर पडलो.” असेही खडसे यांनी सांगितले.