जळगाव : आपल्या पक्षावर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षांतर करणार का ? , असा चर्चा रंगळू लागल्या असतानाच खडसेंनी काही दिवसांपूर्वी त्यांची व्हायरल झलेल्या किपवर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या पक्षांतरा संदर्भात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपचा विषय जुना झाला असून आता तीन-चार दिवसात आपण मोठी बातमी देऊ, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जळगाव येथे दिली.
पक्षातील विविध आघाड्यांवर सातत्याने डावलले जात असल्याने माजी मंत्री एकनाथ खडसे हे नाराज असून याविषयी त्यांनी अनेक वेळा उघड भाष्य केले आहे. त्यानंतर मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी महिनाभरात आपण निर्णय घेणार असून दुसऱ्या पक्षात केवळ काय पद मिळते याची प्रतीक्षा आहे, असा संवाद असलेली ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. ही ऑडिओ क्लीप व्हायरल होताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती .
त्यानंतर आज झालेल्या भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत ऑनलाइन सहभागानंतर खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. या बैठकीनंतर ही खडसे समाधानी नसल्याचे संकेत त्यांच्या वक्तव्यातून मिळालेत्यानंतर आज झालेल्या भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत ऑनलाइन सहभागानंतर खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. या बैठकीनंतर ही खडसे समाधानी नसल्याचे संकेत त्यांच्या वक्तव्यातून मिळाले.
बाबरी मशीद निकाल हा देश हिताचा नाही, लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडेल : प्रकाश आंबेडकर https://t.co/gJt1dUMRLr @Prksh_Ambedkar @asadowaisi @Dev_Fadnavis @BJP4India
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 30, 2020