मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान ‘मातोश्री’ उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. दुबईहून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने याबाबतचा फोन आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मातोश्री निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मातोश्री हे मराठी माणसाचे सन्मानाचे स्थान आहे. दाऊद काय त्याच्या सात पिढ्या खाली आल्या तरी मतोश्रीचे वाकडं करु शकणार नाहीत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“मातोश्री हे मराठी माणसाचे सन्मानाचे स्थान आहे. दाऊद काय त्याच्या सात पिढ्या खाली आल्या तरी मतोश्रीचे वाकडं करु शकणार नाहीत. पाकिस्तान देखील मतोश्रीचे वाकडे करु शकत नाही. दाऊद हा दुसऱ्याच आश्रय घेऊन राहतो. पोकळ धमक्यांना शिवसेना घाबरत नाही”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.