मुंबई : शिवसेना नेते आणि महाविकास आघाडीतील महत्वाचे मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाल्याने ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र तरीदेखील आपल्या माणसांप्रती आणि कामाविषयी शिंदे यांना काळजी असल्यामुळे त्यांनी थेट रुग्णालयातूनच कामाला सुरुवात केल्याचे पहायला मिळाले आहे.
२४ सप्टेंबर रोजी शिंदे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती त्यानंतर त्यांनी उपचाराला सुरुवात केली होती. उपचार घेत असताना आपल्यामुळे एखादे काम रखडू नये यासाठी आता शिंदे यांनी थेट रुग्णालयातूनच कामाला सुरुवात केल्याचे ट्विटद्वारे सांगितले आहे तसेच यावेळेसचा एक व्हिडीओ देखील त्यांनी ट्विट केला आहे.
कोरोना संसर्ग झाल्यानंतर रुग्णालयात उपचार घेत असून कोणत्याही प्रकारची लोकोपयोगी कामे माझ्यामुळे अडून राहू नये म्हणून रुग्णालयातूनच कामाला सुरुवात करीत आहे. आपल्या सर्वांच्या प्रार्थना, आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळे माझी तब्येत सुधारत असून लवकरात लवकर प्रत्यक्ष जनसेवेकरीता हजर होईन असे एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.
#कोरोना संसर्ग झाल्यानंतर रुग्णालयात उपचार घेत असून कोणत्याही प्रकारची लोकोपयोगी कामे माझ्यामुळे अडून राहू नये म्हणून रुग्णालयातूनच कामाला सुरुवात करत आहे. आपल्या सर्वांच्या प्रार्थना,आशीर्वाद व शुभेच्छांमुळे माझी तब्येत सुधारत असून लवकरात लवकर प्रत्यक्ष जनसेवेकरीता हजर होईन. pic.twitter.com/44xmj8FoLu
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 30, 2020
Read Also
सुशांतसिग प्रकरणाच्या चौकशीत सीबीआयने काय दिवे लावले? पवारांचा सवाल https://t.co/YpKjxOQpsL
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 30, 2020