नागपूर : नागपूरमधील श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्टकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सोबत’ हा उपक्रम राबवण्यात आला. कोरोना महामारीच्या संकटात आई-वडील गमावलेल्या १०० मुलांना आधार देण्याचं काम या ट्रस्टद्वारे करण्यात येत आहे. या संस्थेच्या कार्यक्रमला प्रमुख पाहुणे म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलविण्यात आलं होतं. यावेळी, बोलताना देवेंद्र फडणवीसांनी पहिल्याच दिवशी नोंदणी झालेल्या १०० अनाथ मुलांचं पालकत्व स्विकारलं आहे. आपल्या या निर्णयामुळे त्यांनी लाखोंचं मन जिंकलं आहे.
या संस्थेकडे आलेल्या पहिल्या 100 बालकांच्या नोंदणीचे पालकत्त्व मी स्वीकारत आहे. याशिवाय, माझ्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून जी नोंदणी होईल, त्यांचीही संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो आहे.https://t.co/UGMDeUPVOj https://t.co/D0jWL1Tu0D
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 27, 2021
नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी हे श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्टचे प्रमुख असून सामाजिक कार्यासाठी ही संस्था काम करते. सध्या कोरोना महामारीमुळे सर्वत्र विदारक परिस्थिती आहे. या संकटात अनेकांनी आपल्या आप्तेष्ठांना गमावलं आहे. आपले आई-वडिल गमावल्याने कित्येकजण अनाथ झाले आहे. या अनाथ मुलांसांठी ट्रस्टच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला. सोबत या उपक्रमाच्या माध्यमातून अनाथांना मायेची ऊब देण्याचं काम या संस्थेद्वारे होत आहे.
On the occasion of birthday of our leader Hon @nitin_gadkari ji, launched ‘SOBAT’- an initiative of Shri Siddhivinayak Seva Trust, Hingna, Nagpur led by Former Mayor @SandipJoshiNGP.
Former Ministers Girish Mahajan, Chandrashekhar Bawankule & others were present too. pic.twitter.com/UpdHIQL3YU— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 27, 2021
देवेंद्र फडणवीस यांनी संस्थेत नोंदणी झालेल्या मुलांची संपूर्ण जबाबदारी घेती आहे. संस्थेच्या या संपूर्ण कार्यामध्ये तुम्हाला जी मदत लागेल ती मी करेनच. पण, आज नोंदणी झालेल्या १०० बालकांच्या पालकत्वाची जबाबदारी मी घेतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. या कामासाठी सिस्टीम तुम्ही लावायचीय, पण जे पाठबळ लागेल ते निश्चितपणे मी देईल. तसेच, कुणाला हा विचार संकुचित वाटेल. पण मी ही एक लोकप्रतिनिधी आहे. मलाही मतदारसंघ आहे. त्यामुळे, दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील जेवढे अशा प्रकारचे लोकं असतील, तुमच्याकडे त्यांची नोंदणी होईल. त्या सर्वांचा खर्चही माझ्यावतीने मी तुम्हाला देईन. त्यासोबत, आपण सांगाल तिथे, सांगाल त्या व्यक्तीस भेटायला यायची माझी तयारी आहे. आपण सांगाल त्या दानशूर व्यक्तींना भेटून अनेकाचं पालकत्व स्विकारण्याचं आवाहन करण्यासाठी मी सदैव संस्थेसोबत आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.