सीबीआयकडून रिया चक्रवर्तीसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आली असून ईडीकडूनही रियाची चौकशी आज करण्यात येणार आहे. रिया चक्रवर्ती या चौकशीसाठी उपस्थित राहणार की, नाही? यावरुन अनेक शंका-कुशंका उपस्थित करण्यात येत होत्या
अखेर रिया चक्रवर्तीने चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजेरी लावली आहे. दरम्यान, ईडीने समन्स बजावल्यानंतर कोरोना होण्याच्या भितीमुळे रिया चौकशीसाठी उपस्थित राहणार नसल्याचं बोललं जात होतं.
रिया चक्रवर्तीच्या वकीलांनी ईडीकडे विनंती केली होती की, सुप्रीम कोर्टात सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी सुनावणी सुरु आहे. तोपर्यंत याप्रकरणी ईडीने रियाची चौकशी करू नये. परंतु, ईडीने रियाच्या वकिलांचा विनंती अर्ज फेटाळला. 12 वाजता ईडीने रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यासाठी रिया ईडी कार्यालयात आपला जबाब नोंदवण्यासाठी पोहोचली आहे.
आतापर्यंतच्या चौकशीदरम्यान याप्रकरणी ज्या बाबी समोर आल्या आहेत. त्या आधारावर ईडीने याप्रकरणी रियाच्या चौकशीसाठी 3 टप्प्यांमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. याप्रश्नांमधील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की, सुशांतने आपली बँक खाती ऑपरेट करण्याचा अधिकार रियाला कोणी दिला होता?