मुंबई : : औरंगाबादमध्ये भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्र तयार करून सभासद तयार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजप आमदार प्रशांत बंब यांच्याविरोधात औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. गंगापूर साखर कारखान्यातील निधीची अफरातफर केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.
प्रशांत बंब यांनी बनावट कागदपत्र तयार करून सभासदांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांनी सभासदांची फसवणूक करत 15 कोटी 75 लाखांचा अपहार झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.