मुंबई : महाराष्ट्रात कोरोनारुग्णांची संख्या प्रचंड वाढल्याने ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील ऑक्सिजनचा तुटवडा कमी करण्यासाठी देशातील पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस रिकामे टँकर्स घेऊन आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमला रवाना झाली होती. आता ही एक्सप्रेस ऑक्सिजन भरलेले टँकर्स घेऊन महाराष्ट्राकडे रवाना झाली आहे.
‘लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँकरमध्ये भरलेली पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस विझागवरुन महाराष्ट्राकडे रवाना झाली आहे. रेल्वेने देशातील सर्व नागरिकांच्या भल्यासाठी आवश्यक वस्तूंची वाहतूक करणं आणि नावीन्यपूर्ण कामे करुन कठीण काळात देशाची सेवा केली आहे’, अशी माहिती ट्विट करत रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिली.
The first ‘Oxygen Express’ train loaded with liquid medical oxygen tankers has left for Maharashtra from Vizag.
Railways continues to serve the nation in difficult times by transporting essential commodities and driving innovation to ensure the wellbeing of all citizens. pic.twitter.com/4t7ZKbjeIT
— Piyush Goyal (@PiyushGoyal) April 22, 2021
100 टनांहून अधिक लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा या ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’द्वारे महाराष्ट्राला पुरवण्यात येणार आहे. ही ऑक्सिजन एक्सप्रेस आज महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.
या ऑक्सिजन एक्स्प्रेसमुळे महाराष्ट्रातील ऑक्सिजनचा तुटवडा काहीसा कमी होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, राज्य सरकारने महाराष्ट्रातील ऑक्सिजनचा पुरवठा भागविण्यासाठी केंद्राकडे 500 मॅट्रिक टन ऑक्सिजनची मागणी केली आहे.