पुणे : पुण्यात लोकसभेची उमेदवारी रवींद्र धंगेकर यांना जाहीर झाल्यानंतर पुण्यातील कॉंग्रेसचे नेते आबा बागूल यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. यातच त्यांनी आपली नाराजी महानगरपालिकेसमोर धरणे आंदोलन देऊन जाहीरपणे दाखवली होती. तर उमेदवारी न मिळाल्याची खंत त्यांनी मध्यंतरी वारंवार बोलून दाखवली होती. यातच आता आबा बागूल भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा… मोदीजींची गॅरेंटी म्हणजे, गॅरेंटी पूर्ण होण्याची गॅरेंटी ! मुरलीधर मोहोळ
गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात कॉंग्रेस अंतर्गत कुरघोड्या बाहेर येऊ लागल्या आहेत. अशातच पुणे लोकसभेची निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक असलेले कॉंग्रेसचे नेते आबा बागूल यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुर येथे जाहिर भेट घेतली आहे. त्यामुळे ऐननिवडणुकीच्या तोंडावर आबा बागूल यांनी भाजपात प्रवेश केला तर धंगेकर यांची आणखी डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, आबा बागुल हे सलग सहा वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. असे असताना देखील त्यांना कॉंग्रेसने मोठी संधी दिली नाही. अशी खंत आबा बागूल यांनीच याआधी बोलून दाखवली होती. यातच कॉंग्रेसचा उमेदवार ठरविण्याच्या आधीच आबा बागुल यांनी लेटरबॉम्ब टाकून उमेदवारीवरून हेवेदाव्यांचा भडका उडवून दिला होता. अशातच आता आबा बागूल पुन्हा भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे निवडणुक काही दिवसांवर आली असता कॉंग्रेसला अशा पद्धतीने गळती लागायला सुरूवात झाल्याने धंगेकरांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“ही निवडणुक भावकी, गावकीची नाही, “अजित पवार यांचं मोठं वक्तव्य
हेही वाचा…“उमेदवार पियुष गोयल यांना सोसवेना मासळीचा वास “, तोंडाला रूमाल लावून केला प्रचार, कॉंग्रेसचा घणाघात
हेही वाचा. “श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून ५०० कोटी रुपये खाल्ले “, मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्रावर गंभीर आरोप