पुणे –माजी खासदार मा. संजय काकडे यांच्यावर भाजप पक्षने एक मोठी जबाबदारी सोपविली आहे. माजी खासदार मा. संजय काकडे यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी नियुक्तीसंदर्भातील पत्र दिले आहे.
आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून माजी खासदार काकडे यांनी प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे बोलले जात आहे यावेळी मनपा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं होतं त्यामध्ये संजय काकडे यांचा मोठा वाटा होता.
पुणे महानगरपालिकेत भाजपची सत्ता यावी यासाठी प्रचंड प्रयत्न केले होते राज्यसभेत जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी माजी खासदार काकडे यांनी केलेले कार्य तसेच संसदेत काकडे यांचे कार्य उल्लेखनीय आणि अभिनंदनीय असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे काकडे यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा तसेच जनसंपर्काचा उपयोग पक्ष संघटना वाढवण्यासाठी निश्चितपणे होईल असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.