कोल्हापुर: कोल्हापुर जिल्हा दूध संघ गोकुळ निवडणुकीच्या निम्मिताने राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. काल माजी आमदार संजय घाटगे आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना सत्ताधारी गटास निवडणुकीत पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख शिलेदार सावकर मादनाईक, संघटनेचे तालुकाध्यक्ष राम शिंदे यांच्यासमवेतही चर्चा केली. सत्ताधारी राजश्री शाहू आघाडीने दूध उत्पादकांचे हित जोपासले आहे. यामुळे स्वाभिमानीच्या ठरावधारक मतदारानी सत्ताधारी पॅनेलच्या मागे राहावे, अशी आग्रही मागणी केली. यामुळे राजू शेट्टी यांनी सत्ताधारी गटाला पाठींबा दर्शविला होता. Gokul will once again be ruled by the Mahadik group; MP Dhananjay Mahadik made the prediction.
माजी खासदार राजू शेट्टी शेतकऱ्यांचे बँड आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सत्तारुढ आघाडीला पाठिंबा दिल्यामुळे उमेदवारांची झोळी मतांनी तुडुंब भरणार असल्याचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सांगितले. गोकुळ विरोधकांच्या राजकारणाचा अड्डा होवू नये, यासाठी त्यांना गोकुळपासून लांब ठेवले पाहिजे, अशी टिका माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केली. राजू शेट्टी हे राज्यातील शेतकऱ्यांचे नेते आहेत. त्यांना शेतकऱ्यांचे बरे – वाईट समजते. शेट्टी हे शेतकऱ्यांचे बँड आहेत. शेतकऱ्यांसाठी त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत. शेतकऱ्यांना त्याचा फायदाही झाला आहे. शेतक्यांच्या न्यायासाठीच त्यांनी शाहू आघाडीला पाठिंबा दिला आहे असे महाडिक यावेळी म्हणाले आहेत. Gokul will once again be ruled by the Mahadik group; MP Dhananjay Mahadik made the prediction.
महाडिक विरोधक म्हणतात आमचा विजय झालेला आहे. आता केवळ अध्यक्ष निवड करायची बाकी आहे, असे ते सांगत फिरत आहेत. पण, सत्तारुढच्या व्यासपीठावर असलेले माजी खासदार राजू शेट्टी, आमदार पी.एन.पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक व इतर लोकांकडे पाहिले तर 2 तारखेला गोकुळचा निकाल काय असणार, हे आत्ताच सांगू शकतो. हे कोणत्या ज्योतिषाला विचारायची गरज नाही. सत्तारुढ पॅनेल 400 ते 500 मतांनी विजयी होणार असल्याचेही माजी खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. Gokul will once again be ruled by the Mahadik group; MP Dhananjay Mahadik made the prediction.