सर्च इंजिन गुगल १ ऑक्टोबरपासून ‘गुगल प्ले म्युझिक’ सुविधा बंद करणार असल्याची घोषणा गुगल कडून करण्यात आली आहे ‘गुगल प्ले म्युझिक’ सुविधा वापरणाऱ्या सर्वांनी १ ऑक्टोबरआधी ऍपवरील आपली सर्व माहिती सुरक्षित करा. सप्टेंबर महिन्यानंतर या सुविधेसाठी आम्ही कोणतेही पेमेंट स्वीकारणार नाही, असं गुगलने स्पष्ट केले आहे.
गुगलच्या माहितीनुसार त्यांनी बऱ्याच वेळा ‘गुगल प्ले म्युझिक’ बंद करण्याची नोटीस जारी केली होती. कंपनीच्या म्हणण्यानुसार जोपर्यंत ही सुविधा बंद होत नाही, तोपर्यंत वापरकर्ते ही सुविधा वापरू शकतात. तुम्ही जर अँड्रॉइड १० सुविधा असलेला नविन मोबाईल घेतला तर त्यात ‘गुगल प्ले म्युझिक’ ऐवजी ‘यु ट्युब म्युझिक’ हे ऍप आधीच इन्स्टॉल केलेले मिळेल.
वापरकर्ते हे ऍप प्ले स्टोअरवरूनही वापरू शकणार नाही. The Verge ला दिलेल्या अहवालानुसार, गुगल आता केवळ ‘यु ट्युब म्युझिक’ ही सुविधा चालू ठेवणार आहे. गुगलकडून ‘गुगल प्ले म्युझिक’ ऐवजी ‘यु ट्युब म्युझिक’ सुविधा उपलब्ध करून देणार आहे. कंपनीने सांगितले की, ‘यु ट्युब म्युझिक’ हे वापरायला ‘गुगल प्ले म्युझिक’ प्रमाणेच अतिशय सोपे आहे.