मुंबई – महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात शरद पवार यांची भूमिका मोलाची होती. त्यामुळे पंतप्रधानपदासाठी काँग्रेसने शरद पवार यांचे नाव सुचवले असल्याच्या बातम्या काल दिवसभर माध्यमांमध्ये झळकत होत्या.
काल दिवसभर युपीएचे नेतृत्व सोनिया गांधी शरद पवार यांच्याकडे सोपवणार असल्याचा चर्चा सुरु होत्या. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने शरद पवारांनी तिनं पक्ष एकत्र आणले आहेत त्याच पद्धतीने दिल्लीमध्ये देखील सर्व विरोधी पक्ष एकत्र आणण्यास शरद पवार यशस्वी होतील, असे सोनियांना वाटत असल्याचे बोलले जात होते. पण संध्याकाळी शरद पवार यांनी यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.
या सर्व चर्चांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ‘शरद पवार यूपीएचे अध्य़क्ष झाल्यास आनंदच’ अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. संजयनं राऊत म्हणाले,”शरद पवार यूपीएचे अध्य़क्ष झाल्यास आनंदच, मात्र अशा चर्चा सुरु नसल्याचं पवारांचं स्पष्टीकरण, विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मजबूत आघाडी देणं गरजेचं, काँग्रेसला काही निर्णय घ्यावे लागतील.”