भाजप नेते हर्षवर्धन पाटील व त्यांच्या कन्या आणि जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातुन अंकिता यांनी राज्यपालांची भेट घेतल्याचे स्पष्ट केले.
पोस्ट मध्य त अंकिता पाटील म्हणाल्या , ‘आज राजभवन, पुणे येथे महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय भगतसिंह कोश्यारी जी यांना आदरणीय साहेबांच्या समवेत भेटण्याचा बहुमान मला मिळाला. सदैव जनसेवेसाठी तत्पर, प्रशासनाचा व राजकारणाचा प्रदिर्घ अनुभव, या वयात देखील एक वेगळी ऊर्जा त्यांच्या बोलण्यातून व संकल्पनेतून जाणवत होती. तरुणांनी विशेषता युवतींनी राजकारणात सक्रिय होऊन जनसेवा व समाजसेवा करावी यासाठी ते आग्रही आहेत. माननीय भगतसिंह कोश्यारी जी यांच्या या भेटीमुळे पुढील कार्य करण्यास मला एक नवीन ऊर्जा व प्रोत्साहन मिळाले आहे ‘
https://www.facebook.com/2104514476340980/posts/3036108153181603/?extid=N3ZfqcbD5LPawi6V&d=n