मुंबई ; हाथरसच्या प्रकरणाने देशाची मान शरमेने खाली गेली आहे. आणि या घटनेला दडपण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना भेटण्यासाठी अडवनुक करण्यात आली. अनेक वर्ष मी सरकारमध्ये काम केलं आहे पण कधी असं प्रकरण आम्ही नाही बघितलं अशी भावना काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशमधील हाथरस प्रकरण देशात प्रचंड गाजत आहे. उत्तर प्रदेश सरकार आणि प्रशासनावर ताशेरे ओढले जात आहेत. महिलांच्या सुरक्षेकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधक आणि महिला कार्यकर्ते सरकारवर करत आहेत. उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील घटनेने देश हादरला असून आता त्यावरून देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिक्रिया उमटत आहेत.
VIDEO | Hathras Case | योगी सरकारकडून घटना दाबण्याचं काम, माणिकराव ठाकरेंचा हल्लाबोल – TV9 @Manikrao_INC pic.twitter.com/mP3e6hiL9T
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 4, 2020
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी आणि कॉंग्रेस महासचिव प्रियांका गांधी वाड्रा हाथरसमधील पिडीत कुटुंबातील लोकांना भेटण्यासाठी गेले असता त्यांना रस्त्यावर अडवून उत्तर प्रदेश पोलीसांनी धक्काबुक्की केली आहे. त्यानंतर ते काल हाथरस गेले होते. तिचे जाऊन त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. दरम्यान काल प्रियांका गांधींवर पोलिसांनी केलेल्या गैरवर्तनामुळे देशातील अनेक नेते सरकारवर टिका करत आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे १९ वर्षीय मुलीवर झालेला सामूहिक बलात्कार व त्यानंतर तिचा करण्यात आलेला अमानुष खुनामुळं सध्या देशात संतापाची लाट आहे.
हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सर्वच स्तरातून या प्रकरणाचा निषेध केला जात आहे. अशातच भाजपचे एका नेत्याने वादग्रस्त विधान केले आहे. मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होत असल्याचं धक्कादायक आणि संतापजनक विधान भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी केले आहे. सुरेंद्र सिंह हे उत्तर प्रदेशमधील बलिया विधानसभा मतदसंघातील आमदार आहे. हाथरस प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता आमदार सुरेंद्र सिंह यांनी मुक्तफळे उधळली.
Read Also :
मुलींना चांगले संस्कार द्या, बलात्काराच्या घटना आपोआप थांबतील, भाजप नेत्याचे अजब विधान https://t.co/mZ0fLSakc8 @sachin_inc @ChakankarSpeaks @neelamgorhe @ChitraKWagh @Vidyaspeaks @madhurimisal @AdvYashomatiINC @VarshaEGaikwad @Pankajamunde @priyankac19 @VijayaRahatkar
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 4, 2020