नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवली जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भात आदेश दिले आहेत. पुनावाला यांच्या जीवाला असलेल्या धोका पाहता हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
केंद्रिय राखीव पोलीस दल त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करणार आहे. दरम्यान, वाय सुरक्षेत 11 जणांची टीम असते यात एक किंवा दोन कमांडोज आणि पोलिसांचा समावेश असतो.
सीरम इन्स्टि्युट ऑफ इंडिया संस्थेने उत्पादन केलेली लस देशभरातील नागरिकांना दिली जात आहे. सीरम कोविशिल्ड लसीचे उत्पादन करते. सध्या लसीमुळे अदर पुनावाला यांचे नाव सातत्याने चर्चेत आहे. लसीचा तुटवडा आणि याबाबतचे दर जाहीर केल्यानंतर त्यांच्यावर टीका देखील होत आहे.
दरम्यान, सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने आपल्या कोविशिल्ड या लसीची किंमत आता 100 रुपयांनी कमी केली आहे. पूर्वी ही लस राज्य सरकारांना 400 रुपयांना मिळत होती. आता ती 300 रुपयांना मिळणार आहे.