मोदी सरकारविरोधात विरोधकांना एकत्र करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हात मिळवणी केली आहे. यासाठी भाजप सरकार नसलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावण्यात आली होती. यात उद्धव ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांना दिलेल्या उत्तर सध्या चर्चेत आलंय.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आजची बैठक झाली.जीसटी तसंच करोना संकटामुळे राज्यांना झालेलं आर्थिक नुकसान याशिवाय जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्यासाठी वारंवार होत असलेल्या मागणीवर सोनिया गांधी बैठकीत चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज मंत्रीमंडळाची बैठक होती. त्यामुळे सोनिया गांधी यांनी ममता बॅनर्जी यांना उद्धव यांना बोलू देण्यास सांगितले. उद्धव ठाकरे त्यावर ममता दीदींना म्हणाले इजाजत है क्या दीदी..
त्यावर ममता ममता बॅनर्जी म्हणाल्या, उद्धव जी आप बहुत अच्छा फाईट कर रहे है । त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, लढने वाले बाप का लढने वाला बेटा हूं.
जीएसटीचे पैसे केंद्राकडून येत नाहीत. त्यामुळे आधीची व्यवस्था बरी होती की आताची हा विचार करण्याची वेळ आली आहे. काही गोष्टी चुकत असतील तर त्या सुधारायला हव्यात. परत जुनी व्यवस्था लावता येईल का याचाही विचार करायला हवा, अशा अनेक विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली
READ THIS ALSO
‘CM ठाकरेंनी फेरफटका मारावा’ म्हणणाऱ्या राजू पाटील यांना सेना खासदाराने दिले चोख प्रतीउत्तरhttps://t.co/zpQijHMsSw@DrSEShinde @ShivsenaComms
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) August 26, 2020