शिवसेनाप्रमुख आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज २७ जुलै रोजी वाढदिवस असून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वयाची साठी पूर्ण केली.
“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. उद्धवजींच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी मी प्रार्थना करतो” असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
Best wishes to Maharashtra CM Shri Uddhav Thackeray Ji on his birthday. I pray for Uddhav Ji’s long and healthy life. @OfficeofUT
— Narendra Modi (@narendramodi) July 27, 2020
मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रही पाठवले आहे. “वाढदिवस हा गतकाळातल्या स्मृतींना उजाळा देण्याचा दिवस असतो, त्याबरोबरच हा दिवस म्हणजे एक संधी असते भविष्याची रूपरेषा निश्चित करण्याची. मला विश्वास आहे की आजचा दिवस राज्य आणि देश विकासाच्या संकल्पसिद्धीसाठी आपल्याला अधिक बळ देईल. आपल्याला वाढदिवसानिमित्त मी ईश्वराकडे हीच प्रार्थना करेन की त्याने आपल्याला आनंदी आणि आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य द्यावे” असे मोदींनी म्हटले आहे.+