‘माझ्या नातवाच्या मागणीला मी कवडीचीही किंमत देत नाही,’ अशा शब्दात शरद पवारांनी पार्थ पवार यांना फटकारलं होतं. आजोबांचे हे शब्द पार्थ पवार यांच्या चांगलेच जिव्हारी लागले.
पार्थ पवार यांची नाराजी दूर करण्यात आत्या सुप्रिया सुळे यांनी केलेले प्रयत्न अखेर अपयशी ठरले. पार्थसोबत वडील अजित पवारही दुखावले गेले असून उद्या बारामतीत राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात आहे. पार्थ पवार नुकतेच मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघाले असून, आज रात्री आई सुनेत्रा पवार यांना घेऊन बारामतीला जाणार आहेत. तर अजित पवार स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आटपून बारामतीत पोहचणार आहेत.
पार्थचे काका श्रीनिवास पवार यांच्या घरी संपूर्ण कुटुंब एकत्रित येऊन मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या बैठकीला आत्या विजया पाटील ह्यादेखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळेच उद्या बारामतीत मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात आहे.