जळगांव : आता ईथून पुढे उत्तर महाराष्ट्रात फक्त ‘राष्ट्रवादी’चीच हवा असणार आणि माझी ताकद काय आहे आता मी या भाजपला दाखवतोच, अशी गर्जना करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला गंभीर इशारा दिला आहे.
खूप लवकर आता भाजपमधील मोठे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे. जळगांव जिल्ह्यातील भाजपच्या जवळपास 60 कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे बोलत होते.
आता एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यात आणखी ईनकमींग वाढण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तात्कालीन सरकारमध्ये एकनाथ खडसे यांना बाजूला करण्यासाठी जामनेरचे आमदार गिरीश महाजनांना बळ देऊन त्यांना भाजपमधील मोठा नेता बनवण्यात आले.
त्यामुळे जिल्ह्यात एकाच पक्षात दोन वेगवेगळ्या शक्ती निर्माण झाल्या. आता बर्याच काळाने जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर खडसे-महाजन यांच्यात राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Read Also :
“इतना सन्नाटा क्यूँ है भाई?”; सुशांतप्रकरणी सीबीआयला सावंतांचा सवाल https://t.co/RK4f6nV19V @sachin_inc @INCIndi #SSRJusticeDelayed
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) November 2, 2020