वाशिंग्टन : संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेतील निवडणुकीत मराठमोळे श्री ठाणेदार हे निशिगन राज्यातून विजयी झाले आहेत.’हाऊस ऑफ रिप्रेझेंटिटिव्ह’साठी झालेल्या निवडणुकीत डेमोव्रॅटिक पक्षाकडून ठाणेदार उभे होते. त्यांना तब्बल 93 टक्के मते मिळाली. येथे रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराचा धुव्वा उडाला. ठाणेदार हे 25 हजार मतांनी विजयी होऊन आमदार झाले आहेत.
श्री ठाणेदार यांनी मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी ते अमेरिकेत गेले. 1979 पासून अमेरिकेत स्थानिक आहेत. अमेरिकेत यशस्वी उद्योजक असलेले ठाणेदार यांची ‘ही श्रीची इच्छा’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
डॉक्टर एमी बेरा, प्रमिला जयपाल, रो खन्ना आणि राजा पृष्णमूर्ति या चार भारतीय उमेदवारांनी हाऊस ऑफ रिप्रेजेंटेटिक्समध्ये पुन्हा एण्ट्री केली आहे. त्याचबरोबर जेनिफर राजपुमार (न्यूयॉर्प स्टेट असेंबली), निमा कुलकर्णी (केंटुकी स्टेट हाउस), केशा राम (वर्मेन्ट स्टेट सीनेट), वंदना स्लेटर ( वॉशिंग्टन स्टेट हाउस) आणि पद्मा पुप्पा (मिशिगन स्टेट हाउस) या पाच महिला उमेदवारांनी राज्य पातळीवर दमदार विजय मिळवून भारताचा ठसा उमटवला
Read Also :