बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी ‘वर्षा’ बंगल्यावर पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्त आणि मुख्य सचिव यांच्यासोबत घेतलेल्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा केली
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा आढावा घेताना तपासामध्ये पारदर्शकता ठेवण्याबरोबरच चोख तपास करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी केल्याचे समजते.
सुशांतसिंह प्रकरणावरुन राजकारण तापले असून बिहार सरकारने महाराष्ट्रातील पोलिसांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. याशिवाय सुशांतसिंहच्या घरी झालेल्या कथित पार्टीत राज्य मंत्रिमंडळातील एक मंत्रीही सहभागी असल्याच्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवरही या बैठकीत चर्चा झाल्याचे कळते.