भाोपाळ: आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना दणका दिला आहे. आयोगाने कमलनाथ यांचा स्टार प्रचारकाचा दर्जा काढून घेतला आहे. काही दिवसांपुर्वीच एका महिला उमेदवाराबाबत ‘आयटम’ या शब्दाचा वापर केल्याने ते वादात अडकले होते.
If any campaign is done by Kamal Nath from now onwards, the entire expenditure will be borne by the candidate in whose constituency campaign is being undertaken, says Election Commission. https://t.co/M0N1tcfoV7
— ANI (@ANI) October 30, 2020
सध्या मध्य प्रदेशमध्ये पोटनिवडणुकीचा प्रचार सुरू आहे. अशात निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे आयोगाने म्हटले आहे.
आता जर एखाद्या उमेदवारासाठी कमलनाथ यांनी प्रचारसभा घेतल्यास, त्याचा संपुर्ण र्च हा त्या मतदारसंघातील उमेदवाराकडून वसूल केला जाईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.