भोपाळ : भाजपच्या महिला नेत्या इमरती देवी यांच्याबाबत काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ वादात अडकले आहेत. अखेर या वक्तव्याबाबत त्यांनी आता मागितली असली तरीही राष्ट्रीय महिला आयोगाने त्यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त करत, त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
माझं व्यक्तव्य कुणाला आक्षेपार्ह वाटलं असेल तर आपण माफी मागत असल्याचं कमलनाथ म्हणाले. राष्ट्रीय महिला आयोगाने निवडणूक आयोगाला याबाबत कारवाई करण्याची सूचनाही केली आहे.
कमलनाथ यांनी जाहीर सभेत भाजपच्या मंत्री इमरती देवी यांचा ‘आयटम’ असा उल्लेख केला होता. यानंतर स्पष्टीकरण देताना त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या यादीवर आइटम नंबर 1 , आइटम नंबर 2 असे उल्लेख असतात. त्यामुळे मी आइटम हा शब्द वाईट हेतूने किंवा अपमान करण्याच्या हेतूने वापरला नव्हता. या शब्दात काहीही वावगे नाही. सभेतील भाषणावेळी मला आमदार इमरती देवी यांचे नाव आठवत नव्हते. त्यामुळे मी त्यांचा उल्लेख ‘येथील जो आइटम आहे’, असा केल्याचं स्पष्टीकरण कमलनाथ यांनी दिलं होतं.