अभिनेत्री कंगना रनौत आणि ठाकरे सरकारमधील वाद निवळण्याची काही चिन्ह सध्या तरी दिसत नाहीयेत. अलिकडेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात अभिनेत्री कंगना रनौतवर शाब्दिक हल्ला केला होता . मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत विरुद्धच्या खटल्यासाठी महापालिकेने (BMC) आतापर्यंत तब्बल 82 लाख 50 हजार रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या एच-पश्चिम विभागीय कार्यालयाने कंगना रनौतच्या वांद्रे पाली हिल येथील कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली होती. याप्रकरणी कंगना रनौतने उच्च न्यायालयात धाव घेत दाद मागितली होती. न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी मुंबई महापालिकेने आतापर्यंत तब्बल 82 लाख रुपयांचा खर्च केल्याची माहिती पालिकेने माहिती अधिकारांतर्गत दिली आहे.
Muncipal Corporation so far spent 82 lakhs on lawyer for illegally demolition of my house, papa’s Pappu spending public money to tease a girl, this is where Maharashtra stands today, very unfortunate. https://t.co/v6gQFJqdvL
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 28, 2020