मुंबई : शिवसेनेनंतर आता कंगनाने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दिशेने आपला मोर्चा वळवल्याचे दिसून येते.पालिकेने २०१८ मध्ये कंगनाला नोटीस पाठवली होती अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु असताना कंगनाने एका ट्विटमध्ये शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख केल्याचे दिसून येते.
ट्विट करत कंगनानं म्हटलं होतं की, महाराष्ट्र सरकारचे पेड सोर्स चुकीची माहिती पसरवत आहेत. बीएमसीने मला कुठेही नोटीस पाठवली नव्हती. माझ्याकडे सगळी कागदपत्रे होती, जी बीएमसीकडून मला नुतनीकरणासाठी देण्यात आली होती. कमीतकमी बीएमसीनं धेर्याने उभं राहिले पाहिजे आता खोटं का बोलत आहात ? असा सवाल करत तिने ते पत्र पोस्ट केले होते.
वास्तव म्हणजे बीएमसीने कंगनाच्या खार येथे फ्लॅट आहे त्याठिकाणी नोटीस पाठवली होती. ज्या बंगल्यावर बीएमसीने बुधवारी कारवाई केली त्या पाली हिल येथील मालमत्तेला कोणत्याही प्रकारे बीएमसीने नोटीस दिली नव्हती. यावरही जी नोटीस बीएमसीने पाठवली ती फक्त माझ्यासाठी नव्हती तर संपूर्ण इमारतीला होती. केवळ माझ्या फ्लॅटचा इश्यू नव्हता. या नोटिशीला त्या बिल्डरने सामोरे जाण्याची गरज आहे, ही इमारत शरद पवारांशी संबंधित आहे. आम्ही हा फ्लॅट त्यांच्या पार्टनरकडून विकत घेतला आहे. त्यासाठी ते उत्तरदायी आहेत असंही कंगनाने ट्विटमध्ये म्हटलं आहे.
This is what I had told @SaketGokhale in the afternoon, that @KanganaTeam was issued a notice regarding her flat in DB Breeze in 2018, not a notice for this bungalow no 5 at Pali Hill where BMC carried out demolition today. https://t.co/EdI46Wwfmp
— Singh Varun (@singhvarun) September 9, 2020
Read also
मराठा आरक्षणाबत खासदार उदयनराजे अद्याप गप्प का ?https://t.co/wwYxCD9LhI
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 10, 2020