मुंबई : शिवसेनेनंतर आता कंगनाने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दिशेने आपला मोर्चा वळवल्याचे दिसून येते.पालिकेने २०१८ मध्ये कंगनाला नोटीस पाठवली होती अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु असताना कंगनाने एका ट्विटमध्ये शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख केल्याचे दिसून येते. त्यानंतर आता महाविकास आघाडीचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कंगनाला प्रतीउत्तर दिले आहे.
आव्हाड यांनी कंगनावर नाव न घेता निशाणा साधला आहे. शरद पवार यांनी महाराष्ट्र उभा केला, बांधला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये, पण जिला महाराष्ट्राबाबत काहीच माहिती नाही ती म्हणते त्यांनी बिल्डिंग बांधली, मानसिकरोगी अशा शब्दात आव्हाडांनी कंगना राणौतवर टीका केली आहे.
सन्मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांनी महाराष्ट्र उभा केला, बांधला. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये.
पण जीला महाराष्ट्राबाबत काहीच माहीत नाही ती म्हणते त्यांनी बिल्डिंग बांधली.#मानसिकरोगी#UdhavThackeray
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 9, 2020
काय म्हणाली होती कंगना नेमकं
बीएमसीने कंगनाच्या खार येथे फ्लॅट आहे त्याठिकाणी नोटीस पाठवली होती. ज्या बंगल्यावर बीएमसीने बुधवारी कारवाई केली त्या पाली हिल येथील मालमत्तेला कोणत्याही प्रकारे बीएमसीने नोटीस दिली नव्हती. यावरही जी नोटीस बीएमसीने पाठवली ती फक्त माझ्यासाठी नव्हती तर संपूर्ण इमारतीला होती. केवळ माझ्या फ्लॅटचा इश्यू नव्हता. या नोटिशीला त्या बिल्डरने सामोरे जाण्याची गरज आहे, ही इमारत शरद पवारांशी संबंधित आहे. आम्ही हा फ्लॅट त्यांच्या पार्टनरकडून विकत घेतला आहे. त्यासाठी ते उत्तरदायी आहेत असंही कंगनाने ट्विटमध्ये म्हटलं होत.
This is what I had told @SaketGokhale in the afternoon, that @KanganaTeam was issued a notice regarding her flat in DB Breeze in 2018, not a notice for this bungalow no 5 at Pali Hill where BMC carried out demolition today. https://t.co/EdI46Wwfmp
— Singh Varun (@singhvarun) September 9, 2020