मुंबई : कंगनाच्या ऑफिसवर आज मुंबई महानगरपालिकेने हातोडा चालवायला सुरुवात केली होती. पालिकेने कंगनाला ऑफिस अनधिकृत असल्याची नोटीस काल दिल्यानंतर पालिकेने आज कंगनाच्या ऑफिसवर तोडफोड करायला सुरुवात केली होती.मात्र त्यानंतर कंगनाने न्यायालयात धाव घेत पालिकेच्या कारवाईला स्थगिती आणली.
कंगनाने केलेल्या वक्तव्यांबाबत राजकीय वर्तुळातून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या मात्र काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर थेट निशाणा साधत कंगनाचा बोलवता धनी हा भाजप असल्याचा आरोप केला आहे. कंगना महाराष्ट्रातील जनतेचा वारंवार अपमान करते तरी भाजप निषेद व्यक्त करत नाही असे स्पष्ट मत यावेळी सावंत यांनी मांडले.
अभिनेत्री कंगना राणावत मुंबईची तुलना पाकिस्तानव्याप्त काश्मीरसोबत केल्याने तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. शिवेसना खासदार संजय राऊत यांनी धमकावल्याचा आरोप करताना कंगनाने मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटत असल्याचं म्हटलं होतं.
Read Also
कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई बाबत शरद पवार म्हणतात . .https://t.co/fmbsdbVZ7i@PawarSpeaks @mybmc @KanganaTeam
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 9, 2020