मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतने काही दिवसांपूर्वी मुंबईबाबत वक्तव्य करताना अपशब्द वापरले होते त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना यांच्यामध्ये चांगलेच वाक युद्ध रंगल्याचे पहायला मिळाले होते. मुंबई महानगरपालिकेने कंगनाला अनधिकृत ऑफिस संदर्भात नोटीस देखील बजावली होती त्यानंतर आता पालिकेने यावर कारवाई करायला सुरुवात केल्याचे दिसून येते.
पालिकेने आज सकाळी कंगनाच्या कार्यालयावर धाड टाकत अनधिकृत बांधकाम तोडायला सुरुवात केली आहे. कंगना आज मुंबईमध्ये येणार आहे मात्र त्या आधीच कंगनाला मोठा दणका पालिकेकडून देण्यात आला आहे.
कंगनाने पुन्हा केला ‘पाकिस्तान’चा उल्लेख
बीएमसी अधिकाऱयांनी कंगनाच्या ऑफिसची तोडफोड करायला सुरुवात केल्यानंतर कंगनाने ऑफिसच्या आतमधील फोटो ट्विट करत पाकिस्तान असा उल्लेख केला आहे. ऑफिस नंतर कंगनाच्या घरावर देखील पालिका हातोडा चालवणार का ? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.
Pakistan…. #deathofdemocracy pic.twitter.com/4m2TyTcg95
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020