सैफ अली खान आणि करिना कपूर खान या सेलेब्रिटी जोडीने एक गुड न्यूज दिली आहे. मीडियाचं प्रचंड आकर्षण मिळत असलेल्या तैमूर अली खाननंतर (Taimur ali khan)आता आपण आणखी एका पाहुण्याला कुटुंबात स्थान देण्यासाठी उत्सुक असल्याचं सैफ आणि करिनाने जाहीर केलं आहे. गेले कित्येक दिवस बॉलिवूडमध्ये करिना पुन्हा आई होणार असल्याची चर्चा सुरू होती.
सैफ आणि करिनाने आता नव्या पाहुण्याच्या आगमानाची चाहूल असल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं आहे. सैफ अली खान आणि करिना यांचा मुलगा तैमूर अली खान याच्या जन्मानंतर काही दिवस करिनाने चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला होता. त्यानंतर तिचं धडाक्यात पुनरागमनही झालं. आपण पुन्हा एकदा तिने आई व्हायचा निर्णय घेऊ शकतो, असं ती काही मुलाखतींमधून सांगत होती. आता सैफ आणि करिनाने दुसऱ्यांदा ती गोड बातमी शेअर केली आहे.
2009 साली सैफ आणि करीना आपल्या रिलेशनशिपमुळे खूप रहात होते. 2012 साली सैफ आणि करीना यांनी लग्न केलं होतं. टशन या सिनेमाच्या शुटींगजदरम्यान त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली होती. लग्नानंतर 4 वर्षांनी म्हणजेच 20 डिसेंबर 2016 रोजी तैमूरचा जन्म झाला होता. सैफ आणि करीना बॉलिवूडमधील फेमस कपलपैकी एक आहे