मुंबई : रेणू शर्मा प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी नातं मान्य केलेल्या करुणा मुंडे यांनी पुन्हा एकदा राजकारणात येण्याचे संकेत दिले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आमदारकीची निवडणूक लढविण्याची इच्छा असल्याचे म्हटले होते. आता पुन्हा एकदा फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधताना राजकारणात येण्याचे संकेत दिले आहे.
करुणा मुंडे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधताना विविध मुद्यांवर भाष्य केले. कोरोना व्हायरस महामारीमुळे निर्माण झालेल्या स्थितीवर त्यांनी भाष्य केले. यावेळी धनंजय मुंडे यांचाच आपल्याला राजकारणात येण्यासाठी पाठिंबा असल्याचे देखील त्या म्हणाला.
धनंजय मुंडे यांच्यासोबत सुरू असलेल्या वादावर बोलताना त्या म्हणाल्या की, न्यायालयाने यासंदर्भात बोलण्यास मनाई केली आहे. यासंदर्भातील अनेक गोष्टी लवकरच समोर आणणार आहे.
आमच्यामध्ये कोणतेही भांडण नाही. मागच्या 25 वर्षांपासून मी धनंजय मुंडेंसोबत आहेत. त्यांचाच मला पुढे येण्यासाठी पाठिंबा आहे. त्यांनी परळीत येण्यासाठी आमंत्रण दिले आहे. तसेच परळीतून निवडणुकीत लढविण्यास देखील सांगितले आहे, असा खुलासा देखील करुणा मुंडे यांनी केला आहे.