सांगली: सांगली आणि सातारा जिल्हाचे कार्यक्षेत्र असणाऱ्या यशवंतराव मोहिते पाटील कृष्णा साखर कारखान्याची Krishna Cooperative Sugar Factory निवडणूक नुकतीच जाहीर करण्यात आली होती. कोरोना महामारीच्या संकटकाळात निवडणूक प्रक्रिया पार पडत असल्याने अनेक सामाजिक संघटनांनी ही निवडणूक काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात यावी यासाठी प्रयत्न केले होते. शेतकरी क्रांतिकारी पक्ष, मानवाधिकार पार्टी, श्रमिक मुक्त दल (लोकशाहीवादी), स्वाभिमानी पक्षाचे प्रतिनिधी अश्या सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीला विरोध दर्शवला होता.
मागच्या वर्षी होणारी ही निवडणूक कोरोनच्या पहिल्या लाटेमुळे पुढे ढकलण्यात आली होती. वर्षभरानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्यावर पुन्हा एकदा या निवडणुकीचे वारे वाहू लागले होते. मात्र आता कोरोनच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा मोठे संकट निर्माण झाले आणि निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी पुन्हा एकदा राजकीय पक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी केली. कृष्ण साखर कारखाना Krishna Cooperative Sugar Factory स्थापनेपासून असणारे सभासद वयोवृद्ध आहेत आणि त्यांच्या जीवाला कोरोनाकाळात धोका निर्माण होऊ शकतो असे सर्वांचे म्हणणे होते. Krishna Sugar Factory’s election campaign postponed again due to corona
आता नुकत्याच आलेल्या माहितीनुसार कृष्णा साखरकारखाना निवडणूक प्रस्तावास निवडणूक प्राधिकरणनाने परवानगी दिलेली नाही अशी माहिती कारखाना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर District Deputy Registrar Prakash Ashtekar यांनी दिली आहे. या निर्णयामुळे बुधवारपासून म्हणजेच आजपासून होणारी प्रक्रिया थांबली आहे. जेव्हानिवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम येईल, त्याच वेळी तो जाहीर करण्यात येईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश अष्टेकर यांनी दिली आहे.