मुंबई : एकनाथ शिंदे हे राबकरी, कष्टकरी आणि मेहनत करणारे असून , त्यांना दुरावा देऊ नका, राज्यातील विधानसभा बरखास्त करा, परत निवडणुक घ्या आणि शिंदे राज्य येऊ द्या अशी मागणी बाळासाहेब ठाकरे यांचे थोरले पुत्र जयदेव ठाकरे यांनी केलं आहे. काल बीकेसी मैदानावर झालेल्या सभेत जयदेव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते. त्यानंतर राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“माझा मेळावा चिखलफेकऱ्यांचा नाही”..; पंकजा मुंडेंचा शिंदे, ठाकरेंना टोला
एकनाथ शिंदे यांनी ध्यानात घेतले पाहिजे की, ज्या पक्षासोबत आपण सत्तेत आहेत. तो पक्ष समाजासमाजामध्ये भांडण लावून देणारा, आणि पक्ष फोडण्यामध्ये जगप्रसिद्ध आहे. या पक्षाचा तुम्हाला वाण नाही पण गुण लागलेलं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे काल तुमच्या सभेत उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधू जयदेव ठाकरे यांनी दिसले. यावेळी त्यांनी तुम्हाला यावेळी त्यांनी मोलाचा सल्ला दिला आहे की, हे सरकार बरखास्त करा आणि निवडणुक घ्या. जर तुम्ही त्यांना मानत असाल तर त्यांचा ऐका आणि निवडणुका घ्या. असं देखील खरात यांनी म्हटलं आहे.
“उद्धव ठाकरेंनी विचारही केला नसेल, एवढं मतदान आम्हाला होणार”; चंद्रशेखर बावनकु
शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदेंना साथ दिली. उद्धव ठाकरे यांच्या जवळचे नातेवाईकांनी देखील शिंदेंना पाठिंबा दिला. यातच जवदेव ठाकरे देखील शिंदे गटात जाणार असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. त्यावर जयदेव ठाकरेंनी भाष्य केलं आहे. बीकेसी मैदानावर आलो आहे. ठाकरे कधी लिखीत घेऊन येत नाहीत. हा ठाकरे कुणाच्या गोठ्यात बांधला जात नाही. एकनाथ शिंदेंनी दोन चार भूमिका घेतलेल्या मला आवडल्या. त्यांच्यासारखा धडाडीचा माणूस महाराष्ट्राला हवा असल्याने मी याठिकाणी आलो असल्याचं त्यांनी म्हटलं.
“दिवाळं काढणारं सरकार सत्तेवरून गेल्यावर यंदा आनंदाची दिवाळी”; सदाभाऊ खोत
दरम्यान, काल बीकेसीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली. यावेळी राज्यभरातून अनेक कार्यकर्ते बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदे यांच्या सभेला उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर शिवसेनेचे 40 बंडखोर आमदार आणि 12 खासदारांसह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते देखील उपस्थित होते. यावेळी शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टिका केली.
Read also
- “आज एकनाथ शिंदेंनी श्रीकृष्णाची भूमिका बजावलीय, पण त्यांच्या मुलाने काय केले?”; शरद पोंक्षे
- “गद्दार, हिंदुत्व, पन्नास खोके, अन् आता खोकेश्वर”; शिवतीर्थ ठाकरेंनी गाजवलं
- शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांकडून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना चोप…! सभेआधीच झाला राडा
- #चला_बीकेसी होतोय, ट्विटवर ट्रेंन्ड..! मुंबईत आज सभांचा पाऊस पडणार
- “मुंडे साहेबांसोबत नरेंद्र मोदी, अमित शहांचा देखील वारसा चालवतेय”; पंकजा मुंडे