मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान कोरोनामुक्त झाले आहेत. शिवराजसिंह चौहान यांच्या तिसरा कोरोना तपासणी अहवाल आज निगेटिव्ह आल्याने त्यांना भोपाळच्या चिरायु रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
मात्र रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला तरी त्यांना डॉक्टरांनी पुढील खबरदारी म्हणून सात दिवस घरीच सल्ला दिला आहे. 25 जुलैला शिवराज कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर त्यांना भोपाळच्या चिरायु रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर दहा दिवसांपासून उपचार सुरू होते.
मैं आज पूर्ण स्वस्थ होकर घर वापस लौटा। मैं डॉक्टर्स, नर्सेज़ सहित पूरी टीम को धन्यवाद देता हूँ, जिन्होंने मेरा सदैव ध्यान रखा। #CoronaWarriors निस्वार्थ भाव से अस्पताल के प्रत्येक मरीज़ की देखभाल कर रहे हैं।
आप भगवान का रूप हैं। आपका यह ऋण मैं कभी नहीं चुका सकता हूँ। pic.twitter.com/C86gaBbEc2
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) August 5, 2020
दरम्यान चिरायु रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शिवराजसिंह चौहान यांनी बोलतांना ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येत राम मंदिराचा पायाभरणी करत असल्यानं 500 वर्षांपूर्वी सुरू झालेला ‘महायज्ञ’ आज संपत असल्याचं म्हंटल आहे.