महाविकासआघाडी सरकारमधील अंतर्गत कुरुबुरी काही थांबलेली दिसत नाही. महविकासआघाडी सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच काँग्रेस हा देखील महत्वाचा पक्ष आहे. . मात्र, या सरकारमधून काँग्रेसला डावललं जात आहे, असं काँग्रेस मंत्र्यांचं म्हणणं आहे. याच पार्श्वभूमीवर या नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली आहे.
अनेक काँग्रेस नेते नाराज असल्याची चर्चा आहे. ते आपली नाराजी सोनिया गांधी यांच्याकडे व्यक्त करणार आहेत. त्यांनी सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी वेळ मागितली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सोमवार किंवा मंगळवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे सोनिया गांधी यांच्यासोबतच्या दिल्लीतील बैठकीत महाष्ट्रातील काँग्रेसचे सर्व मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती एका काँग्रेस नेत्याने दिली आहे
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण काही दिवसांपूर्वी नाराज असल्याची माहिती समोर आली होती. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीची बैठक पार पडली अशोक चव्हाण यांच्यासह आणखी काही काँग्रेस मंत्री नाराज असल्याची चर्चा आहे. समन्वय समितीतून नाराजी दूर होत नाही. अशी काँग्रेस नेत्यांची तक्रार आहे.