वाशीम – जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन समितीच्या कार्यकारी समितीची सभा होण्यापूर्वी शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप जिल्हाध्यक्ष व आमदार राजेंद्र पाटणी या दोघांमध्ये वाद झाल्याची घटना घडली. यानंतर वाशिममध्ये काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. राजेंद्र पाटणी यांनी भावना गवळींविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे वाशिममध्ये तणाव निर्माण झाला होता
शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप जिल्हाध्यक्ष व आमदार राजेंद्र पाटणी या दोघांच्या वादांनंतर आता वाशिम शिवसेनेच्या खासदार भावना गवळीयांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपमुळे आता नव्या वादाला तोंड फुटणार आहे.
वाशिम शिवसेनेच्या खासदार भावना गवळी आणि भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात झालेल्या वादाला समृद्धी महामार्गाची किनार आहे का असा प्रश्न सध्या उपस्थीत होत आहे, कारण खासदार भावना गवळी यांची ठेकेदाराला काम न करण्याची धमकी दिल्याची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे हा वाद आता कोणत्या टोकाला जाईल हाच प्रश्न सगळ्यांना पडला आहे. खासदार भावना गवळी आणि आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात विकासाच्या मुद्द्यावर खडाजंगी झाल्याचं सांगत असले तरी कारण मात्र वेगळंच आहे हे या आजच्या ऑडिओ क्लिप वरून सध्या तरी दिसते.
दरम्यान, शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामध्ये झालेल्या वादामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दोघांमध्ये झालेल्या वाद पोलीस कर्मचारी व इतर कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केल्यानं मिटला. मात्र, या घटनेची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांनी खासदार भावना गवळी यांच्या विरोधात अश्लील शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार वाशिम शहर पोलीस स्टेशनला दिली आहे. यावेळी आमदार समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी भावना गवळींविरोधात घोषणाबाजी केली.