मुंबई : विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यांकडे सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, परिवहन मंत्री अनिल परब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेत, त्यांच्याकडे उमेदवारांची यादी सोपवली आहे.
काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्येकी 4 नावांची शिफारस करण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून सादर करण्यात आलेली नावे –
काँग्रेस –
- रजनी पाटील (समाजसेवा आणि सहकार)
- सचिन सावंत (समाजसेवा आणि सहकार)
- मुझफ्फर हुसेन (समाजसेवा)
- अनिरुद्ध वनकर (कला)
शिवसेना –
- उर्मिला मातोंडकर (कला)
- नितीन बानगुडे पाटील
- विजय करंजकर
- चंद्रकांत रघुवंशी
राष्ट्रवादी काँग्रेस –
- एकनाथ खडसे (समाजसेवा आणि सहकार)
- राजू शेट्टी (सहकार आणि समाजसेवा)
- यशपाल भिंगे (साहित्य)
- आनंद शिंदे (कला)
भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसेंना देखील अपेक्षेनुसार उमेदवारी मिळाली आहे. तसेच मागील अनेक दिवसांपासून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची देखील चर्चा सुरू होती. त्यांच्याही नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. राष्ट्रवादीकडून प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांना उमेदवारी दिल्याने या नावाची सध्या विशेष चर्चा सुरू आहे.
दरम्यान, राज्यपाल ही नावे फेटाळण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. याविषयी बोलताना राज्यपाल या यादीवर शिक्कामोर्तब करतील अशी आशा असल्याचे नवाब मलिक म्हणाले.