भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.मागील अनेक महिन्यांपासून त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरू होत्या. त्याच्या निवृत्तीनंतर अनेक क्षेत्रातील मान्यवर मंडळी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहे.
त्यातच आता महेंद्रसिंह धोनी निवृत्तीनंतर राजकारणात प्रेवेश करणार आहे का असा सवाल उपस्थित झाला आहे. महेंद्रसिंह धोनीला भंपकडून निवडणूक लढणायचा सल्ला देण्यात आला आहे. भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींनी हा सल्ला धोनीला दिला आहे. त्यांनी याबाबत ट्विट देखील केले आहे
M. S. Dhoni is retiring from Cricket but not from anything else. His talent-to be able to fight against odds and his inspiring leadership of a team that he has demonstrated in cricket is needed in public life. He should fight in LS General Elections in 2024.
— Subramanian Swamy (@Swamy39) August 16, 2020
दरम्यान, भाजपच्या या प्रस्तावावर महेंद्रसिंह धोनी काय उत्तर देणार? तसेच धोनी खर्च राजकारणात सक्रिय होणार का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.