जिम व इतर व्यवसाय कोरोनामुळे ठप्प झाल्याने बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे ह्या सर्वावर विचार करत स्वतःच्या अॅडव्हायजरी काढून जिम व इतर व्यवसाय सुरु करत न्याय द्यावा, अशा सूचना दिल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे. त्यामुळे जिम चालकांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.
राज्यात वाढती बेरोजगारी लक्षात घेता जिम बाबत महाराष्ट्र्र सरकारने स्वतः पुढाकार घेत केंद्र सरकारच्या अॅडव्हायजरी येण्याची वाट न बघता स्वतःच्या ऍडवायझरी काढून जिम सुरु करावी,अशी सूचना केल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले यांनी सांगितले. मुळातच अनलॉक बाबत केंद्र सरकार अॅडव्हायजरी काढत असून त्यांच्या अॅडव्हायजरीचे पालन राज्य सरकार करत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या जिम चालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. कोरोनाचा लाॅकडाऊन झाल्यापासून जिम, व्यायामशाळा बंद आहेत. त्यामुळे जिम सुरु करुन दिलासा द्यावा या अपेक्षेने जिम चालकांनी राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी भेट घेतली होती.
तसेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील मुख्यमंत्र्यांना जिम सुरु करण्याची मागणी काही दिवसांपूर्वी केली होती.
Read Also This
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची गाडी विद्यार्थी सेनेने अडवली ! पोलिसांचा आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्जhttps://t.co/YxVQf73z0u@AbdulSattar_99
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) August 26, 2020