मुंबई : कोरोना संकटाच्या काळात हॉस्पिटल रुग्णांकडून लाखो रुपये वसूल करत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. विधान विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी अशाच एका कोविड संकटकाळात सामान्य नागरिकाला लाखो रुपयांचे बिल पाठविणा-या व जोपर्यंत बिल भरत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यत न देण्याचा मुजोरपणा करणा-या मालाड येथील लाइफलाइन मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाच्या राक्षसी लुटमारीचा पर्दाफाश केला.
महापालिकेने लूटमार करणाऱ्या अश्या रुग्णालयांविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करुन लुटमार करणारी हॉस्पिटल सील करावीत अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
कोविडच्या संकटकाळात सामान्य नागरिकाला लाखो रुपयांचे बिल पाठविणा-या व जोपर्यंत बिल भरत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यत न देण्याचा मुजोरपणा करणा-या मालाड येथील लाइफलाइन मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाच्या राक्षसी लुटमारीचा आज पर्दाफाश केला. pic.twitter.com/PWxFE7uov5
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) September 1, 2020
मालाड पश्चिम येथील लाइफ लाइन मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाने एका मृत नागरिकांच्या कुटुंबाला 21 लाखांचे बिल थोपवले. शिवाय ८ लाख भरूनही त्या रुग्णाचा मृतदेह ताब्यात देण्यात येत नव्हता. याची माहिती मिळताच दरेकर यांनी रुग्णालयात धाव घेत तेथील लुटमारीचा पर्दाफाश केला.
महापालिकेने लूटमार करणाऱ्या अश्या रुग्णालयांविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करुन लुटमार करणारी हॉस्पिटल सील करावीत अशी मागणीही केली. याप्रसंगी आमदार भाई गिरकर, विनोद शेलार, बाबा सिंह, भाजपचे मंडल अध्यक्ष सुनिल कोळी, नरेंद्र राठोड, दिपक जोशी, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) September 1, 2020
दरेकर म्हणाले की, रुग्णालयांकडून सरकारच्या परिपत्रकाला केराची टोपली दाखविली जात आहे. केवळ परिपत्रक काढून चालत नाही तर त्यावर नियंत्रण व त्याचे मॉनेटरिंग करणे आवश्यक आहे, मात्र येथे हा अभाव आहे. म्हणूनच 300 रुपयांचे किटचे 3 हजार 500 रुपयाचे बिल लावले जाते. अशा रुग्णालयांना कारवाई करून त्वरित सील करावे, अशी मागणी त्यांनी केली.