“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमचे पक्षप्रमुख आहेत. सरकारमध्ये सत्तेत असताना आमदारांची कामे झाली पाहिजेत, अशा सूचना काही आमदारांनी मुख्यमंत्र्यांना केल्या आहेत. आमदारांच्या या सूचनेवर मुख्यमंत्र्यांनी उपाययोजना करायला सुरुवात केली आहे”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीच्या आमदारांच्या तुलनेने शिवसेना आमदारांच्या कामांना हवी तशी गती मिळताना दिसत नाही, अशी तक्रार शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती समोर आली आहे. यावर राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची मंगळवारी (11 ऑगस्ट) संध्याकाळी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर ही बैठक पार पडली. बैठकीनंतर ते बोलत होते