पुणे : आज भाद्रपत अमावास्या अर्थात बैलपोळा.शेतकऱ्यानी आपल्यासाठी कष्टकरणाऱ्या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण. कोरोणाचे संकट असूनही आज ग्रामीण भागात शेतकऱ्याने बैलपोळा सण आनंदात साजरा केल्याचे पहायला मिळाले.विशेष म्हणजे भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी देखील बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केल्याचे दिसून आले.
आज सहकुटुंब पारंपारिक पद्धतीने बैलपोळ्याचा दिवस (भाद्रपद अमावस्या) शेलपिंपळगाव येथील आमच्या शेतामध्ये साजरा केला!#बैलपोळा pic.twitter.com/ZIslQK1jrJ
— Mahesh Kisan Landge (@maheshklandge) September 17, 2020
आमदार महेश लांडगे यांचे बैलांवरचे प्रेम सर्वानाच परिचित आहे.कारण बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी महेश लांडगेंनी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे समस्त बैलगाडा प्रेमींनी पाहिले आहे.म्हणूनच लांडगे यांनी आजच्या दिवशी शेलपिंपळगाव येथिल आपल्या शेतामध्ये पारंपरिक पद्धतीने बैलपोळा साजरा केला. बैलपोळ्या निमित्त लांडगे यांनी सहकुटुंब सहपरिवार बैलांची पूजा केल्याचे यावेळी दिसून आले. कोरोना संकट जावून बैलगाडा शर्यत लवकर सुरू होऊ दे… अशीच काहीशी प्रार्थना यावेळी महेश लांडगे यांनी केली असावी असे त्यांनी केलेल्या सोशल मीडियावरील पोस्टवरून तरी वाटते.