बदनापूर तालूक्यातील वाल्हा येथील आत्महत्या ग्रस्त शेतकरी परमेश्वर नरवडे यांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी आमदार नारायण कुचे यांनी पुढाकार घेतला, कुचे यांनी थेट नायबतहसीलदार शिंदे यांना सोबत घेऊन नरवडे कुटुंबाची भेट घेतली. तसेच तहसीलदारांच्या साक्षिने आमदार कुचे यांनी यावेळी मदतीचा धनादेश नरवडे कुटुंबाला सुपूर्त केला.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा राज्यातील मोठा विषय आहे मात्र आता लोकप्रतिनिधींकडून याबाबत दाखल घेतल्याचे समाधान यावेळी नरवडे कुटुंबीयांनी व्यक्त केल्याचे दिसून आले. यावेळी मंडळ अधिकारी पाऊलबूध्दे, गणेश कोल्हे, भगवानराव घाडगे, नामदेव गिते , एकनाथ मोरे , बाबासाहेब नरवडे , रघूनाथ होळकर, बद्रीनाथ फटाले,रामेश्वर नरवडे,तूकाराम नरवडे,माणिकराव घाडगे, संदीप खरात, शरद गिते, समाधान मुडें,सूदर्शन शिंगाडे, आदी ग्रामस्थ उपस्थितीत होते.