लाखांदूर तालुकयातील मरेल उपसा सिंचनाच्या अपूर्ण बांधकामामुळे पालपेंढरी, तिरखुरी, सोनेगान, पेंढरी या गावांमधील शेतीला पाणी मिळत नसल्याने पऱ्हे कार्पण्यचा मार्गावर आले होते. रोवणीही खोळंबली होती. पऱ्हे जगवण्यासाठी पाणी सोडा अशी हाक शेतकऱ्यांमधून येत होती. दरम्यान या शेतकऱ्यांच्या मदतीला विधान परिषदेचे आमदार डॉ परिणय फुके आले. त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या नेरला उपसा सिंचनाचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी जेसीबी मशीनची व्यवस्था करून दिली त्यामुळे दोन दिवसात शेतकऱ्यांना पाणी मिळून सिंचनाची सोया होणार आहे.
विदर्भातील सर्वात मोठी सिंचन योजना असलेल्या गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत येणाऱ्या नेरला उपसा सिंचन योजनेचे काम कासवगतीने सुरु आहे त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची शेती प्रकल्पाखाली जाऊनही सिंचनाचा प्रश्न प्रलंबित आहे. सादर प्रकल्पाचे काम बोरगाव आणि खांबाडी या गावांजवळ अपूर्ण असल्याने पालपेंढरी, तिरखुरी, सोनेगान, पेंढरी या गावांना पाणी मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले होते .
आमदार फुके यांनी शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली. त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची हि अडचण सोडवण्यासाठी आमदार फुके यांनी तातडीने दोन जेसीबी मशीनची व्यवस्था केली आणि रखडलेल्या कामाला सुरुवात केली त्यामुळे पालपेंढरी, तिरखुरी, सोनेगान, पेंढरीया गावातील शेतीला पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पऱ्हे जगविणे आणि रोवणीसाठी आता शेतीला पाणी मिळणार असल्याने सर्व शेतकऱ्यांनी आमदार फुके यांचे आभार मानले आहेत.