अहमदनगर : बारडगाव दगडी मधील काही वाड्या वस्त्यांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेचा ग्रामस्थ, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ करण्यात आला. तसेच मिरजगाव मधील प्रस्तावित विकास कामांमुळे गाळे धारकांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेत विकासकांमांचे नियोजन आमदार रोहित पवार यांच्या मार्गर्शनाखाली करण्यात आले.
कर्जत तालुक्यातील काही भागात असलेले पाण्याचे दुर्भिक्ष कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजना व नियोजनामुळे कुकडी पाणलोट क्षेत्रातील जलसाठे १० वर्षात प्रथमच पूर्ण क्षमतेने भरले. बारडगाव दगडी, कोपर्डी व करमनवाडी येथील तलावांचे स्थानिक ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधवांच्या उपस्थितीमध्ये आमदार रोहित पवार यांनी जलपूजन केलं. विशेष म्हणजे या वर्षी पाण्याचे योग्य नियोजन झाल्याने व मुबलक पाणीसाठा असल्याने या पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या बारडगाव दगडीच्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भुईमुगाचे पीक घेतले आहे, या भेटी दरम्यान शेतकऱ्यांनी भुईमुगाच्या शेंगा भेट दिल्या असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला दाम मिळाला पाहिजे म्हणून महाराष्ट्र शासनाची किमान आधारभूत किंमत योजना (२०२०-२१), तसेच नाफेड व मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत कर्जत आणि टाकळी खंडेश्वरी येथे हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन व तूर खरेदी केंद्रांचे उदघाटन केलं. शासकीय हमीभाव केंद्रे सुरू होताच खाजगी केंद्रांनी उडीदाचा ५०० रुपये प्रति क्विंटल दर वाढवला असल्याचे दिसून आले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव समूळ नष्ट करण्यासाठी #MVA सरकारने #माझे_कुटुंब_माझी_जबाबदारी हे महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, घरोघरी जावून कोरोना लोकसहभागातून हे अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी कर्जत तहसील कार्यालयात प्रशासकीय अधीकाऱ्यांसोबत बैठक यावेळी रोहित पवार यांनी घेतली. यावेळी कर्जत तालुक्यात आजवर कोरोनाशी लढलेल्या कोरोना वॉरिअर्सना भेटून, शुभेच्छा देवून त्यांचे मनोबल रोहित पवार यांनी वाढवल्याचे पहायला मिळाले.
स्वच्छ भारत व कर्जत नगरपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘कर्जत स्वच्छता मिशन’अभियानांतर्गत कचरा व्यवस्थापन व कचऱ्यावरील प्रक्रिया यासंबंधी नियोजन व आढावा बैठक घेण्यात आली.
कोरोनामुळे काही प्रमाणात नव्या विकासकामांना ब्रेक लागला असला तरी नियोजित कामे कालबद्ध सुरू आहेत. कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या भोसे आणि चांदे बुद्रुक शाळेच्या नव्या खोल्यांचे तर चखालेवाडी येथे अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन आणि बारडगाव दगडी येथील अंगणवाडीचे रोहित पवार यांनी लोकार्पण केलं.