अहमदनगर – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे गेल्या विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड मतदार संघातून निवडून आले. त्याला आता पूर्ण झाले आहे. रोहित पवार यांनी निवडून आल्यांनतर आपल्या मतदारसंघात अनेक विकासकामे केली. तसेच त्यांच्या मतदारसंघातील गोरगरीब रोहित पवार यांनी आधार दिला. मात्र आता गुंडगिरीपासून अभय देणाऱ्या आमदार रोहित पवार यांचे जामखेड आता चोरांच्या भितीने भयभीत झाले आहे.
दिवाळी सणाच्या तोंडावर चोरांचा धुमाकूळ सुरू झाला आहे. जामखेड येथील मोरे वस्तीवर राहणारे बोराडे व जायभाय यांच्या घरावर चोरांनी चोरी करीत घरातील व्यक्तींना मारहाण केली. बोराडे यांच्या घरी बाप-लेकीने केलेल्या प्रतिकारामुळे प्रसंगावधान राखीत चोरट्यांना पळ काढला, तर दुसरीकडे मात्र जायभाय यांच्या घरी मारहाण करुन जीवे मारण्याचा धाक दाखवून सोन्याचा ऐवज लुटला.
या प्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात चार चोरट्यांविरुद्ध बाळासाहेब बोराडे आणि बाबासाहेब रावसाहेब जायभाय यांच्या यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला. तसेच चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी नागरिक आमदार रोहित पवार यांना साकडे घालीत आहेत.
Read also
महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष पुर्ण करणार- मंत्री प्राजक्त तनपूरे https://t.co/SyEygTi9xK @prajaktdada
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) November 3, 2020